१४ ऑग, २०१३

शरद पवारांचा असली सावरकरवाद !

 शरद पवारांचा असली सावरकरवाद !अन्यायग्रस्त मुसलमान सूड घेणारच - शरद पवार उवाच अन्याय झाला तर मुसलमान सूड घेणार हे शरद पवारांचे वक्तव्य खालील व्हीडियोत आहे : https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=60L61-WZMHA

नकली सावरकर भक्त साले खूप बघितले । कंटाळा आला आता … सावरकराची कविता लई भारी म्हणायची …  आणि गायीचे मूत केशवाय नम: करत संध्येला अचमने करत प्यायचे ! असले भिकार सनातनी भिक्षुक - सावरकरांनी ज्या गायीला पशु म्हटले आहे । तिच्या खुराला बांधले पाहिजेत . सावरकराचा विचार आणि आणि त्याचा आचार सावरकरांच्या पोटाच्या पोरांना जमला नाही यात आश्चर्य नाही !

आश्चर्य असे कि सावरकराच्या भीषण खतरनाक सूड वृत्तीला आज माननीय शरद चंद्र जी रावजी पवार जी साहेबाकडून समर्थन कसे मिळाले ? निष्पाप मुस्लिम तरुणावर जर अन्याय झाला - तर त्याचा सूड घ्यायचे लायसन्स पवारांनी कसे बहाल केले ?

मुस्लिमांनी लोकसंख्या वाढवली कि   सनातनी …. हिंदुना पण संख्या वाढवायचे फुसकुले आव्हान करणार हे उघड आहे ! त्यांनी संख्या वाढवली कि … आपण पण वाढवायची ! मग देशाच्या मर्यादित साधन संपत्तिचा विचार कोण करणार ? संघासकट  दक्ष म्हटलेल्या   ब्रह्मचार्याच्या सक्षम फौजेकडून असले लैगिक आवाहन आम्ही कधी अपेक्षित केले नव्हते  -  पण धक्का बसला नाही ! !   - कारण - हिंदुत्व वाद्यांच्या अचाट बुद्धिमत्तेवर    आमचा पुरेसा विश्वास !

त्यांचा मुल्ला - इमाम कायद्याच्या कचाट्यातुन सुटतो … मग आमचा खुनी शंकराचार्य पण अटक होता कामा नये ! त्यांनी जर हजारो वर्षा पूर्वी मंदिरे पाडली असतील । तर आज। आजच्या काळात …  आम्हीपण मशिदी तोडू ! त्यांनी ज्या गोष्टी भुतकाळात केल्या असतील । त्या आम्ही आज पण करू!  ते एकटेच गटारीत का लोळतात ?? । आम्ही पण लोळू ! गटारीत लोळायचा हक्क दोघांचा !!!

हिंदुत्वाच्या मागण्यांचे स्वरूप असे प्रतिक्रियात्मक आहे ! जशास तसे - ठोस्याला  ठोसा - हुंब्याला हुंबा - लावोनि द्यावा - अशा मागण्या जेंव्हा हिंदुत्व निष्ठ करतात । तेंव्हा धक्का बसत नाही … पण ।

हिंसेला हिंसा , लांडग्याला लांडागा , ज्युडाइसम ला ज्युडाइसम , इस्लामी separate  हैद्राबादला उत्तर म्हणुन  - हिंदु त्रावणकोर भारतात सामील होता कामा नये ! असे सावरकरी तर्क आज विचित्र वाटु लागले होते !


सावरकरांच्या विचाररसरणिचा मुळातून कोठे तरी चीकात्सक विचार झाला पाहिजे . मूर्खाला मूर्ख । आक्रमणाला आक्रमण । इस्लामला हिंदुत्व ।हिंसेला हिंसा  । लांडग्याला लांडागा!  हा विचित्र पणा आहे असे आम्हाला कुठेतरी वाटु पहात होते !

पण आमच्या मनावर शरदाचे चांदणे कि काय असे बहरले कि काय म्हणता !


आज आम्हास हे सावरकरी तत्वज्ञान पूर्णपणे पटले आहे ! जर मुस्लिम तरुणावर अन्याय झाला तर …. त्याने हा देश आपला कसा काय  मानावा ? जर अन्याय झाला तर मुसलमान सुड घेणारच ! त्यात चुकले काय ? माननीय शरदचंद्रजि रावजी पवार जी साहेबजी यांच्या अमृत वचनांतुन हा दृष्टांत आम्हाला मिळालेला आहे !

कारण साहेब मुस्लीमास … माणूस मानत नाहीत … भारतीयही मानत नाहीत !  फक्त सुड प्रवृत्ती …… किंवा    हलकट मतपेढी मानतात ।

अन्यायग्रस्त मुस्लिमाने सूड हा घेतला पाहिजेच ! पण कोणाविरुद्ध ? त्यावर हा अन्याय करणार्या महाराष्ट्र पोलिसांविरुद्ध ? शरद पवारांच्या आबा पाटलाच्या गृह खात्याविरुद्ध ?  राष्ट्रवादी कोंग्रेसविरुद्ध ?कि तथा कथित बायस्ड मिडियाविरुद्ध ?  कि निष्पाप हिंदू समाजाविरुद्ध ?


शरद पवारांच्या मते हा सूड जरूर घेतला गेला पाहिजे … आणि जर सूड घेण्यासाठी काही मुस्लिम तरुण दहशत वादाकडे झुकले तर त्यात वावगे काही नाही !


शरद पवार साहेबांनी असा   सूड वृत्ती चा जो सरकारी सन्मान चालवला आहे… त्याने आमचे मन भरून आले आहे। डोळे आणि गळा पण  … फक्त साहेबाना एक गोष्ट लक्षात आणुन देऊ इच्छितो  कि  ।

आपणाला जर सावरकरी सूडाचा सन्मानीय प्रचार करायचा असेल तर ….तर … तर । तर ….

 फक्त एव्हढे लक्षात ठेवा कि हा प्रचार सावरकर - अज्ञ ,मनुवादी ,  दळभद्री, जातीय , बावळट  पण स्वकीय हींदुसाठि करत होते ……………

तुम्ही हा प्रचार । समतावादी ! एकतावादि ! मानवतावादी ! देशभक्त !  आणि अहींसक मुस्लिमांसाठि करत आहात !

हा तुमचा सावरकरवाद अधिक असली आहे … हे पटलेच !

तुमचे विचार पटले आणि आजपासून मी पुन्हा …तुमचा……. सावरकरवादी ……। झालो …. हे वेगळे सांगायला नको च !
११ टिप्पण्या:

 1. उत्तम तिरकस शैली. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी.

  उत्तर द्याहटवा
 2. उत्तम अभिराम. लेख आवडला, आणि तुझी लिहिण्याची शैली नक्कीच आकर्षक आहे. आय विश मला पण असेच लिखाण करता आले असते तर बरे झाले असते सावरकर काहींच्या साठी एकदम देवासमान किंवा काहींच्या साठी संडासवीर - काय विपर्यास आहे! कुठेही तौलनिक, ड्रिल डाऊन डिटेल्ड विश्लेषण नाही, कोणत्याही महापुरुषाचा "मला हा विचार आवडतो पण तो विचार आवडत नाही" असले काही नाही. एकतर माझ्या तातीचा असेल तर त्याने रस्त्यावर शी केलीतरी ती कशी सुगंधी होती असे भासवायचे आणि दुसर्या जातीचा असेल तर त्याला ठोक ठोक ठोकायचे, चारित्र्यहनन करायचे. अमेरिकेत जेफरसन आणि वाशिंग्टन ह्यांचे विश्लेषण करताना त्यांचे गुण आणि दोष दोन्हीही वाचलेले आहेत, दोघांनीही स्लेव्ह अथवा गुलाम बाळगले होते पण तरीही त्यांना राष्ट्रपिते मानतात. भारतात विचारवंत म्हणायला आणि म्हणून घ्यायची पटली अगदी लो आहे. तू माझा महावीर सांगलीकरांशी आलेला वाद वाचलास का? आता मला मी फक्त ब्राम्हण नसून वैदिक ब्राम्हण आहे म्हणून सर्वच्या सर्व सामाजिक प्रॉब्लेमना मीच जबाबदार आहे, मी मुलनिवासींना गुलाम बनवले, जाती बनवल्या, धर्म बनवला, अंधश्रद्धा बळावल्या आणि सगळ्या बहुजनांना त्यांची इच्छा नसताना अंधारात ठेवले, ह्या धर्तीचा मूर्ख आणि बुद्धिहीन आरोप आणि वाद करण्याचा अगदी पुअर प्रयत्न केला जात आहे. सावरकर थोर होते का नव्हते ह्याचे उत्तर सावरकर थोर साहित्यिक कवी होते, देशभक्त होते पण गांधीहत्येत त्यांची भूमिका ही सवंग होती, त्यांचे मराठी प्रतिशब्द शोधण्याचे मला बिलकुल आवडत नाही, ह्या धर्तीचे हवे. आमचे बिनडोक विचारवंत त्यांना संडासवीर आणि माफिवीर मानण्यात धन्यता मानतात. दुसरा सावरकर (किंवा आंबेडकर, फुले शिवाजी) कधीही तयार होणार नाही ह्याची खात्री करतात आणि ह्यामुळे भारताचे आणि महाराष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल नक्कीच नाही आहे ==> सस्नेह - कोहम

  उत्तर द्याहटवा
 3. अभिराम - योग्य लिहिलेत! या भाकड जाणत्या राजाने असले सवंग विधान करावे हे फारच आश्चर्यकारक, नव्हे धक्कादायक आणि भयंकर, आहे. कोहम यांची प्रतिक्रिया एकदम पटली.

  उत्तर द्याहटवा
 4. ईमानदार राजकीय नेत्याला सुद्धा पक्षाचेच हित पाहून बोलावे लागते , देशहित पाहून नव्हे . पवारांकडून दुसरी अपेक्षा ठेवणेच भाबडेपणाचे आहे.

  उत्तर द्याहटवा
 5. संडासविर नपूंसक राञसंत
  स्वातंञ्यकाळात क्रांतीसिंह नाना पाटीलांचा ठावठिकाना सांगनारा हाच तो संडासविर व त्याची पिवावळ

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. पाटीलसाहेब ! त्या माणसाने पोटात व कमरेत काचा घुसल्यावरसूध्दा २२ फूट उंचावरून खारट पाण्यात उडी मारली. पोहतापोहता फ्रान्सचा किनारा
   गाठला. अनेक क्रांतिकारकांचे जनक व प्रेरणास्थान असणारे सावरकर.
   क्रांतीसिहांचा आणि स्वातंत्र्यवीरांचा कधी संबंध तरी आला होता का ?
   सावरकरांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यापेक्षा ब्रिटीशांचे रक्त
   सांडणा-या क्रांतिकारकांचा निषेध करून ब्रिटीशांना श्रध्दांजली वाहण-या
   मवाळवाद्यांवर टिका करा !

   हटवा
 6. विपर्यास आणि प्रचंड गैरसमज असा दुहेरी शाप मिळालेले क्रांतिकारकांचे कुलपुरूष स्वातंत्र्यवीर सावरकर ! ज्यांचे कौतुक तुमच्यासारख्यंना सहन होत नाही.

  उत्तर द्याहटवा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *