९ जून, २०१३

अर्पणपत्रिका

.

अर्पणपत्रिका


राजघराणं's picture

कविता
शांतरस
भजन चाल : जैसे सूरज की गर्मी से जलते हुए तन को मिल जाए तरुवर की छाया


शब्दाला वाचेला काव्याला श्रद्धेला 
जेथे अर्थ प्राप्त झाला

अर्थाचा परमार्थ परमात्म्याचा स्वार्थ 
जेथून व्युत्पन्न झाला 
 त्या स्वराला

अर्पिता मम काव्य ॐ कारा
 तत्तक्षण काव्याचा जो मंत्र झाला
मंत्र तो गाउनी समिधा ती अर्पूनी 
जो धूम्र उत्पन्न झाला 
 त्या धुराला

अवकाश जे व्याप्त 
त्यासही भेदून एकमात्र 
जो बाण गेला

बाणाची प्रत्यंचा प्रत्यंचेचे बल
 बलाचा उद्गम त्या उद्ग्माला
 वंदिताना

जो भाव बुद्धीचा विवेक नामाचा
 त्याचाहि जो अंतरात्मा 
तद् भावनेला

अर्पण


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *