१५ नोव्हें, २०१२

देवाला रिटायर करण शक्य नाही

कोणी तरी म्हटलं देवाला आता रिटायर करा
मी म्हणालो नस्त्या भानगडी कशाला ?
रिटायर करायला आधी त्याला कामावर कोण ठेविल ?
अन्स्किल्ड लेबर ला अजकाल जॉब नाय भेटत भाउ.
साधे भुकंप आणी वादळ ज्याला थांबवता येत नाहीत.
आपत्ती देवाच्या कोपाने होते हे भाव थोपवता येत नाहीत
त्याच्याविरुद्ध कोणी वागला तर ज्याच्या भावना काबूत रहात नाहीत
असल्या मत्सरी देवाला आपण नाय कामावर ठेवणार
माणुसकीच ग्रॅज्युएशन नापास झालेल्याला कोण दील काम ?
त्यात पास व्हायला आधी तर्काची शाळा पास व्हावी लागते भौ
दोन जमातींचे देव वेगळे असू शकत नाहीत एव्हढही त्याला कळत नाही
काफिर आणी दलितांना जन्म देणारा तो महामूर्ख
स्वतःच्याच हाताने हीन दीन पेगन बनवणारा तर्कदुष्ट
शहाणपणाची बाराखडी येत नसेल तर; शाळेत कोण घील ?
स्वतःच निर्मिलेल्या कफिरांविरुद्ध जिहाद,
हीदनांविरुद्ध क्रुसेड आणी अवर्णांशी धर्मयुद्ध
करण चुकीच आहे हे साध बालवाडी ज्ञान मिळवायला
विश्वाच्या अंतिम दिनापर्यंत थांबाव लागत त्याला
असल्या मतिमंदाला बाराखडी तरी कशी यील.
बाराखडी येण्यासाठी आधी जन्म घ्यावा लागतो भौ
बोला - ज्याचा जन्मच झालेला नाही - त्याला रिटायर कसं करायच ?


Dr Abhiram Dixit

३ टिप्पण्या:

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *